ये जिंदगी ना मिले दोबारा…..

नुकताच रायगडावर गेलो होतो.

टकमक टोकावर गेलो. तिथे शेवटच्या टप्प्यात अगदी टोकावर जायचं धैर्यच होईना.

मनाने कम्फर्टेबल निर्णय घेवून टाकला – “कशाला उगाच नाही ते साहस ?”

लगेच बुद्धीचं अनुमोदन : “मग काय …काही गोष्टी जमतात, काही नाही त्यात काय एवढं”

तरी डोळे पाहत होते…

एक माझ्यापेक्षा १० वर्षानी मोठा [आणी कदाचित १० किलोंनी सुद्धा] असा एक माणूस नुसता उभाच नव्हता तिथे, तर चक्क हातवारे करत होता, त्याच्या कॅमे~यानी द्रूष्य टिपत होता.

त्याच वेळी वृंदा , तिच्या नेहमीच्या स्टाईलमधे गप्पा बिप्पा मारत , अर्चना अगदी सहज पणे तिथून जावून आल्या.

मी, निषाद म्हणालो सुद्धा … अरे, सांभाळा, निसर्गाशी मस्ती नका करू वगैरे.

एवढ्यात, स्वाती, जंगम हे सर्व लोक अगदी सहज हसत, खिदळत जावून आले सुद्धा..

मी ? तिथेच.

मग एकदम लख्खकन चमकलं टक्कु~यात….

एका व्यक्तीनी मागे एकदा शेअर केलं होतं. एक तमाम एम.एल.एम. धरतीवरचाच कार्यक्रम होता तो. असेनाका, पण ती व्यक्ती जे बोलली ते मात्र लाख मोलाचं होतं.ते साधारण ह्या अर्थाचं होतं -

एखादा वेगळा मार्ग, किंवा एखादं वेगळं आव्हान जेव्हा उभं राहतं तेव्हा भीती वाटणं, वैताग येणं हे असतच. तर ते होवू नये म्हणून सगळ्यात सोप्पा मार्ग कुठला ? —–>

ते “न” करणे.

पण जर का आपण ते केलं…भीती वाटत असून सुद्धा, तर मात्र आनंदाची प्रचंड द्वारं आपल्यासाठी उघडतील.

आणी मी [म्हणजे कुणी] निर्णय घेतला, गेलो त्या वाटेनी, आणी अनुभवली ती भीती. तिथून नुस्ता जावून नाही आलो, तर तिथे थांबलो. खाली पाहिलं, भोवळ आली. म्हटलं मी आज मेलो तरी चालेल, हे अनुभवणारच.

एक विलक्षण अनुभव होता तो. कोणीतरी म्हणालं सुद्धा.. अरे एवढं काही होत नाही बरं का ! , खरं सुद्धा असेल.

विनोबांच्या गीता प्रवचनांमधे त्यांनी एका संन्याशाचं उदाहरण दिलंय. की एकांतात साधना करून करून त्याचं मन इतकं हळवं [नाजूक] झालं होतं, की त्याला पूजेला ज्या घरी बोलावलं , त्या घरातल्या छोट्या मुलाच्या बागडण्याचा सुद्धा त्याला त्रास व्हायला लागला.

असं सुद्धा झालं असेल माझं कदाचित…

पण असो, जिंदगी ना मिले दोबारा चा मात्र प्रत्यक्ष अनुभव आला.

जर्मनीतलं एक कुटुंब जगतंय “पैशाशिवाय” – बाय चॉईस !

बर्लिन [जर्मनी] मधील एक कुटुंब “पैशाशिवाय” जगतंय. फेल्मर हा ह्यातला पुरूष.

तर, ह्या फेल्मरनी १२ व्या वर्षापासून अनेक ठिकाणी नोक~या केल्या , सोबतच शिकतही होताच. शिक्षण संपल्यावर तो आणी त्याचा एक मित्र ह्यांनी एक मोठी पदयात्रा काढली. म्हणजे ही केवढी होती ? तर फक्त युरोप ते मेक्सिको. “माणुसकीची सफ़र” असं त्याचं नाव होतं. उद्देश : जगभर चाललेलं प्रचंड वेस्टेज : १/३ अन्न [निर्माण केलेलं वाया जातं-अमेरिकेत हे प्रमाण ४० % हून अधिक आहे] – ह्याविषयी जगरूकता निर्माण करणे.

हा सगळा १८ महिन्यांचा आणी १९,००० मैलांचा प्रवास ह्या तिघांनी – फ़ेल्मर, त्याची बायको आणी एक मित्र ह्याणी जवळ एकही पैसा न बाळगता केलाय – ह्यात एका मोठ्या जहाजावरच्या कामाचाही अंतर्भाव आहे. प्रत्येकवेळी मोबदल्यात शारिरीक किंवा पडेल ते काम करून त्यांनी त्या बदल्यात अन्न, वस्त्र , निवारा मिळवलाय .

दरम्यान त्यांना एक छानशी मुलगी सुद्धा झाली.आता ते सर्व बर्लिन मध्ये ह्याच पद्धतीने राहतात. फ़ेल्मर जरी अजिबात पैशांचा वापर करीत नसला , तरी त्याची पत्नी मात्र सरकारकडून मिळणारा “बालक-कल्याण निधी” अत्यल्प प्रमाणात वापरते.

एक पालक म्हणून फेल्मर म्हणतो की मुलांना पैशाची किंवा फॅन्सी कपडे, खेळणी ह्यांची अजिबात गरज नसते , त्यांना हवं असतं प्रेम, आणी त्याकरिता पालकांचा वेळ. कपडे वगैरे दुस~यांचे  वापरण्याचा अजिबात प्रॉब्लेम नसतो.

सध्या फेल्मर ह्या वाया जाणा~या गोष्टींवर प्रचंड काम करतोय. फेकण्या-आधीच त्या वस्तू वापरात आणणे, जर्मनीभर त्याने “फ़ूड-शेअरिंग” हा प्रकार पसरवलाय. त्याला विस्तॄत प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हे सगळं करत असताना त्याच्या लक्षात अजून एक गोष्ट आली ती म्हणजे , असे असंख्य लोक आहेत , ज्यांच्या कडे अतिरिक्त प्रमाणात घरं किंवा जागा आहेत, आणी त्यांना तिथे कुणीतरी हवंय. तो म्हणतो “आपल्याला जे-जे हवं आहे, ते इकडे सगळं आहेच, फक्त योग्य कनेक्शन्स करायची गरज आहे-बस्स !

पण अशा प्रकारे जगणारा फेल्मर काही एकटाच नाहिये ! हेडमेरी श्वर्मर नामक एक ६८ वर्षीय स्त्री आहे , जिने १४ वर्षांपूर्वीच “पैसा-त्याग” केला , आणी ती अत्यंत सुखात जगत आहे.

म्हटलंच आहे ना :-

हे विश्वाचे आंगण , आम्हां दिले आहे आंदण !

सौजन्य :-

 

http://shine.yahoo.com/financially-fit/family-lives-without-money–by-choice–and-thrives–190436599.html 

“लर्निंग होम” मधली सुट्टी मध्ये …..

आजच झी मराठी वर मधली सुट्टी वर “लर्निंग होम” चा एपिसोड पाहिला. त्याचं यू-ट्यूब वरील हे चित्रण.

ह्या पोस्ट्करिता फक्त लर्निंग-होम संदर्भातलं रेकॉर्डिंगच घेतलंय. पं.ह्रिदयनाथांचा भाग गाळलाय [विषयाला अनुसरून-बाकी काही नाही.]

भाग १

भाग २

भाग ३

 

 

 

 

 

 

 

 

 

काही वाखाणण्याजोग्या गोष्टी :-

१. नील चं — “अभ्यास फास्ट करते” – बेष्ट !
२. शाल्मली चं “कबुतर” मस्त.
३. सानिका , निसर्गा चं अगदी मोजून-मापून बोलणं
४. ईशा,आभा,डो …अरे कुठे होतात तुम्ही ?
५. अभिषेक चं – “दूध”
६. चैतन्यचं “डिप्लोमॅटिक” उत्तर : क्रिकेटवरचं
७. आपला लर्निंग होम चा परिसर,वर्ग, हे सगळं अगदी वैषिट्यपूर्ण आहे. थोडस्सं त्याचं शूटिंग आलं असतं तर….
८.आणी ….ते खेळ कुठे गेले यार ? अमरजा म्हणाली होती की पोरं जिंकली वगैरे …ऑं ?

हं….तरी एकंदरीत पोग्राम बेष्ट झाला म्हनायचा !

असो ! उणे आणी खंती किती काढायच्या , पण सलील आणी टीमला धन्यवाद …

लर्निंग होमला टीव्ही वर संधी दिल्याबद्दल.

तरी काही मोजकी छायाचित्रे इथे टाकतोय :-

non formal education school in pune - learning home

 

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

non formal education school in pune - learning home

 

हा एअरपोर्ट नाही , चक्क एसटी स्टॅंड आहे , तोही महाराष्ट्रातला !

होय ! अगदी खरं आहे हे. हा एस.टी. स्टॅंड आहे सिन्नर, एक तालुका , पुणे-नाशिक मार्गावरचा.

Sinnar Bust Stand Road Side View

बी.ओ.टी. तत्त्वावर म्हणजे – बिल्ड-ओन-ट्रान्सफर ह्या प्रकारे चालवलेला बहुधा पहिलाच एस्टी उपक्रम. एका उद्योजकाने तो बांधलाय, तो सर्व व्यवस्था पाहणार , ३० वर्षांपर्यंत आणी नंतर एसटीला हस्तांतरीत करणार, असं एका सह-प्रवाशाने सांगितले. पण उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे. नाहीतर महाराष्ट्रातले स्टॅंड म्हणजे अरारा ! कोणी कर्नाटकातले पाहिलेत ? हुबळी, बंगलोर, अगदी विजापूर सुद्धा. प्रशस्त, मोठ्ठे , ब~यापैकी स्वछ असतात. बंगलोर ला तर रिटायरिंग रूम, आंघोळीची व्यवस्था सुद्धा आहे.

गुजरात चे स्टॅंडसुद्धा भंगार आहेत [मोदींच्या राज्यात]. मध्य प्रदेश तर विचारायलाच नको. जबलपूरच्या स्टॅंडवर मी ४-५ वर्षांपूर्वी गेलो होतो. अत्यंत गचाळ ! असो.

पण सिन्नरचा स्टॅंड पाहिल्यावर मात्र आशा वाढलिये हे नक्की !

काही छायाचित्रे :-

सीलिंग मधे कल्पकता

sinnar bus stant deling

मुख्य प्रवेश्द्वार

sinnar bus stand entrance

आतील स्वच्छता :-

inside sinnar bus stand

कोनशिला

मुख्य स्थानक

sinnar bus stand main stand area

बसण्याची व्यवस्था

inside sitting arrangement in sinnar bus stand

सुंदर , नीटनेटके आणी “कळणारे” वेळापत्रक

Time Table of Sinnar Bus Stand

राजाराम पुलावरचा ट्रॅफिकचा गोंधळ : काही सूचना ……..

राजाराम पुलावर हल्ली सकाळी अत्यंत ट्रॅफिक असतं. विविध ठिकाणांहून वाहनं एकाच वेळी येतात. तरी मातोश्री व्रुद्धाश्रमापाशी कोंडी होते.एक सूचना वाहतूक खात्याला – कमिन्स कॉलेजकडून येणा~या वाहनांना जर मातोश्री च्या मागच्या बाजूने वळवल्यास फार उत्तम होईल. म्हणजे ह्या पॉइंटच्या पुढे नो एंट्री करायची. शिवाय सकाळी पीक-अवर्स ला एखादा पोलीस उभा केल्यास गोंधळ टळेल.


View Larger Map

दुसरं म्हणजे – पुलाकडून सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कडे वळताना जो सिग्नल लागतो , तो सर्व वाहनचालक अगदी सर्रास तोडतात – अगदी २०-२० सेकंद बाकी असूनसुद्धा ! बरेच वेळा पोलिस सुद्धा काही बोलत नाहीत. हे २० सेकंद बहुधा क्रॉसिंग वाल्यांकरिता असावेत. मोठा रस्ता असल्याने , व्रुद्धांची , बयाबापड्यांची खूप तारांबळ उडते.

माडियांबद्दल थोडस्सं ….

Maadiyaa Tribe Marriage Pillarनुकतंच भामरागड तालुक्यातल्या हेमलकसाला जाऊन आलो. हे महाराष्ट्राचं अगदी दक्षिण-पूर्व टोक म्हणता येइल. नक्षलवादानी पोखरलेला गडचिरोली जिल्हा. महाराष्ट्र,छत्तिसगड आणी आंध्र यांच्या बेचक्यातला हा अत्यंत घनदाट आणी दुर्गम प्रदेश.

तिथले ते माडिया-गोंड आदिवासी. त्यांच्याबद्दल अधिक कुतुहल जागृत झालं.ह्या मंडळींना नाच हा परम-प्रिय. तो त्यांच्या जीवनाचा जवळ-जवळ रोजचाच भाग असतो असं म्हणता येइल. तसंच मोहाची दारू आणी ताडी ही सुद्धा अविभाज्य घटक – सरकारने त्यांना विषेश परवानगी सुद्धा दिलिये त्यासाठी.

त्यांचं आणखी एक वैषिष्ट्य म्हणजे तिथली गोटुलं. हे एक प्रकारचं समाज-मंदीरच म्हणता येइल. इथे युवक-युवत्या एकत्र येतात, नाच गाणी करतात. बस्तर [छत्तिसगड मधला एक भाग] इथल्या माडियांप्रमाणे इथे मात्र माडिया लोक तिथेच न राहता आपापल्या घरी जातात झोपायला. परंतु लग्नापूर्वी स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याची मुभा असते. ती तिचा जोडीदार स्वत: निवडू शकते तसेच त्याने वाईट वागणूक दिल्यास अथवा त्याच्यापासून मूल न झाल्यास ती त्याला सोडू शकते. तिची कमाई तिच्या मनाप्रमाणे ती खर्च करू शकते. असं जरी असलं तरीही तेंदूची पानं गोळा केल्यावर , ती वर्गीकरण केल्यावर , विक्री मात्र नव~याच्याच नावानेच का हे मात्र एक कोडंच आहे.

तिच्या “पिरियड्स” च्या काळात मात्र तिच्यावर काही निर्बंध असतात.

लग्न ठरल्यावर वर एका खांबावर सुंदर नक्षीकाम करून तो खांब गोटुलासमोर पूर्ण लग्न होईस्तोवर तस्सच ठेवतो. त्याला “मुंडा” म्हणतात.

आरोग्याच्या समस्या इथे प्रचंड होत्या-आहेत. पण प्रकाश आमटे ह्यांच्या लोक-बिरादरीने बहुमोल कामगिरी करत माडियांना एक बहुमोल आधार दिलाय.

Image courtesy :- Vikram Gupchup

 

 

 

 

होऊ दे जरासा उशीर

होऊ दे जरासा उशीर हा चित्रपट आज पाहिला.

माझ्या एका मित्राने “अगदी जरूर पहाच” असं सांगितल्यामुळे गेलो होतो. नावावरूनच साधारण विषयाची कल्पना होतीच. की आपण , सगळे कसे अगदी “जीवन की दौड में” लगलेले आहोत, टारगेट्स कसा आपला पित्त्या पाडतात, आणी एवढा मोठ्ठा वेळ असूनसुद्धा आपल्याला तो कसा कधीच मिळत नाही, आणी अचानक ना-ईलाजास्तव सो-कॉल्ड वाया जाऊ पाहणा~या दिवसाने कशी आपल्याला उपरती होते वगैरे….

ही मध्यवर्ती कल्पना मांडायला सुरुवातीला कथेचा चांगला आधार घेतलाय. आय.टी कंपन्यांमधले मॅनरिजम्स वगैरे चांगले घेतलेत. पण ही नको तिथे गाणी का घालतात हे कळतच नाही. उदा. ते आय.टी. इंजिनियरचं स्वप्न-रंजनाचं गाणं- अजिबात गरज नाही त्याची. मस्त मौला सदाशिव अमरापूरकर च्या तोंडातली ती १-२ गाणी , आणी आदिती शारंगधर-चिन्मय मांडलेकरचं प्रेम-गीत , हे अगदी रस-भंग करतात. बाकी ड्रायव्हरचं काम छान, शर्वरी जमेनीसचं व्यवस्थित तर ऐश्वर्या नारकरचं एक नं. क्लोज-अप्स खूप आहेत आणी कुठल्याही पार्श्व-संगीताशिवायचे शॉट्सही खूप छान वाटतात.

खरं म्हणजे खूप घाईत सिनेमा उरकलाय , आणी त्यात गाणी वगैरे “टाकून” झटपट प्रॉडक्ट मारकेट मध्ये “लॉंच” केल्यासारखा वाटला. का गडबड केलीत भाऊ ? होऊ दे ना जरासा उशीर !

ऑस्कर मधे दाखवला गेलेला मराठी चित्रपट अशी जाहिरात करतायत याची. थोडा तपशील कळला तर बरं होईल. नक्की काय वाटलं ऑस्कर सारखं ते तरी कळेल.

आणी जर खरंच असेल , तर ऑस्कर बद्दल फार वाटून घ्यायचं बंद करून टाकू, हल्ली नाही का , कोणीही ब्लॅक-बेल्ट होतात , कोणत्याही कंपन्यांना आय.एस.ओ. मिळतं …तस्संच काहीतरी.

म्हणजे “तुमचं आस्कर आता बास कर” असं तरी म्हणता येइल !

अमृतयात्रा नव्हे ,आनंदयात्रा

पुणं सोडतानाच्या वेळेपासून परतेपर्यंत अनुभवला फक्त आनंद. आता त्यात काही कमी-जास्त गोष्टी असतील तर असू देत. म्हणजे वर्ध्याला थोडा जास्त वेळ गेला, पवनार व्यवस्थित पाहता आलं नाही वगैरे. पण ह्या सर्वांसकट जो एकत्र वेळ सोबत गेला त्यातला आनंद -त्याची बरोबरी कशाही बरोबर करताच येणार नाही.

इथे मी टिपिकली प्रवास-वर्णन लिहायचं टाळणार आहे, आणी गांधीजी,विनोबा,बाबा आमटे ई. बद्दलही मी लिहावं असं काही नाहीच मुळी. ह्या सा~या लोकोत्तर व्यक्ती. फक्त त्या लोकोत्तर का होत्या किंवा आहेत , हे मात्र फार फार जवळून अधोरेखीत झालं एवढं नक्की !

 काही-काही गोष्टी मला खास करून जाणवल्या त्या म्हणजे :-

१. ट्रिपला गेल्या गेल्या अनेक, तसंच आल्यानंतरही अनेक जण आजारी पडलेत-पडताहेत [ माझ्यासकट] . खरं म्हणजे सगळीकडे फक्त सुखच सुख होतं. हवं तितकं जेवण-पाणी पूर्ण बिसलेरी , एसीतून प्रवास वगैरे. तरीही मंडळी आजारी. ह्याचा अर्थ आपण किती फुसके झालो आहोत हे पहा !

२. अनेक नवीन मित्र-मैत्रीणी गवसले. ट्रिप्स किती महत्त्वाच्या आहेत हे मनावर ठसलं.

३. नेहा फडके हिचे विषेश आभार. ना नेहा ती जाहिरात बघती-ना ही ट्रिप अस्तित्वात येती !

४. अमृतयात्रा तर्फे काळे-देव-पागे कं. ने व्यवस्थित सगळे मॅनेज केले. कुठ्ठेही आम्हाला तोशिस पडू दिली नाही.

५. अर्थात लोकं जास्त जवळ आल्यानंतर काही कुरबुरी , एकामेकांबद्दल थोड्या तक्रारी वगैरे व्हायच्याच. हे अनहेल्दी अजिबात नाही. किंबहुना , एकामेकांतले गैरसमज दूर होवून संबंध अधिक निर्मळ होतील अशी माझी १००% खात्री आहे.

 ६. आपण खास ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे – चेक-आऊट म्हणजे राहण्याचं ठिकाण सोडताना कोणीही भान ठेऊन स्वच्छता केली नाही. बिस्किटांचे पुडे , पिशव्या तश्शाच पडलेल्या. कुण्णीही अंथरूणं गुंडाळून ठेवलेली नाही. काही – काही जणांनी तर पांघरूणांच्या सुद्धा घड्या केलेल्या नव्हत्या ! आपण “पैसे दिलेत” हा approach नसावा . निदान जी ठिकाणं आपण पाहतोय ती पाहून तरी !

७. सांगितल्याप्रमाणे वरती एक पैसा सुधा खर्च करावा लागला नाही- खरेदी सोडून.

८. आल्या आल्या माझा घसा जाम झाला-डोळे चुरचुरायला लागले. प्रदूषण रहित वातावरणातून एकदम धुरांड्यात आलो ना !

९. शोध-ग्राम ला राणी बंग तरी भेटायला हव्या होत्या ही खंत राहिलिये मनात ! कारण ह्या संस्था म्हणजे त्या-त्या व्यक्तींच्या नावावरूनही ओळखल्या जातात.

१०. विकास-भारती-शीतल आमटे ह्यांनी आनंदवनात , तर दिगंत-अनिकेत आमटे ह्यांनी हेमलकसा इथे यथाशक्ती वेळ दिला.

विकासजींचं बोलणं-शब्दांत सांगता येणर नाहे इतकं अप्रतीम- अनुभवायलाच हवं. आम्हाला हे भाग्य २-३ तास लाभलं. पुनर्वसित कुष्ठरोग्याचं पुनर्वसन कसं करावं – ह्यातलं नोबेलच्या वरही काही असेल तर ते पारितोषिक त्यांना मिळावं .

शीतल सुधा सकाळी भेटली , अगदी ओपनली तिनं तिची मतं मांडली- सगळ्यात मह्त्त्वाचं म्हणजे- शिक्षणाचा विषेश उपयोग नसतो असं ती म्हणाली !

११. भारतीताई  ह्या खास वेळ काढून सोमनाथला भेटल्या आणी अत्यंत खुलेपणाने अगदी व्यक्तिगतही  दिलखुलासपणे बोलल्या हे विषेश.
असो. पण एकंदरीत गोळा-बेरीज :- ९०% मार्क्स.

थँक्स टू काळे काका , नेहा , लर्निंग होम !

काही फोटो :-

ताडोबातलं भुताचं झाड

 

 

 

 

 

 

 

रान-डुकराचे “पग-मार्क्स”

 

 

 

 

 

 

 

 

 

डीझेल ….गॅस …… महागाई …..

inflationसकाळी ९-१५ – ग्रुप क्र. १

“हल्ली कोण पण गाड्या घेतं राव”

“अरे, जागा विकून पैसे आलेले असतात ना !”

“बरोबर आहे १ रू चे १ कोटी मिळाल्यावर काय व्हायचं”

“पण सगळे दारू, किंवा पनवेल ला जातात हे पैसे , माहितिये ?”

“हं.. इनव्हेस्ट्मेंट्चं नॉलेजच नसतं यार ह्यांना”

“जागाच विकतात फटाफ़ट, सोनं का नाही घेत कुणास ठाऊक”

“त्यांचं ठीक आहे रे, पण आपल्यासारख्यांनी काय करायचं ?”

——————————————————————–

१०-१५ जिम :- ग्रुप क्र. २ :-

“काय बरेच दिवसांनी …

“जरा कामात होतो…

“चांगलं आहे, म्हणजे कामं पाहिजेतच हो

“!”

“नाहीतर हल्ली अवघडच आहे ना!

“५०,००० रू सुद्धा पुरायचे नाहीत.

“हो , हो.

“घरचा खर्च, इ.एम.आय. , गाडीचा हप्ता, इन्श्युरन्स…

“मुलांची शिक्षणं भलतीच महाग झालीयेत हल्ली.

“हो, तरी बरं बाई , मी स्वैपाक घरीच स्वत:च करते

“ऑं ? त्यापेक्षा बाई लावा , आणी तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह का करत नाही ?

========================================

सकाळी ११-१५ परशुराम हॉटेल , कर्वे नगर.ग्रुप क्र. ३ :-

“१० रू.नी डिझेल वाढलं”

“आता सर्वच हळू-हळू महाग होत जाणार”

“अवघडच आहे यार कॉमन माणसाचं”

“१००० रू. गॅस झाल्यावर गरीबानं करायचं तरी काय”

“एकंदरीत काय , तर खर्च वारेमाप वाढत चाल्लेत अगदी”

——————————————————————-

ह्या सर्व संवादांच्या शेवटी एकच कॉमन वाक्य होतं :-

“इनकम वाढवण्याशिवाय पर्याय नाही”

तुमचं मत ?

 

रॅशनल थिंकिंग

तुझं वेगळं , माझं वेगळं
गरजेपुरतं एकत्र , पुन्हा वेगळं
कित्ती छान ना ?
हे हे ! हॅप्पी थॉट्स , थिंक पॉझिटिव्ह यार !
नो नो माय डिअर ,
थिस इज रॅशनल थिंकिंग …..

प्रत्येक माणूस वेगळा असतो यार
त्याचे मूड्स , स्वभाव वगैरे….वगैरे.
जरी सगळ्यांना हव्या असणा~या गोष्टी सारख्याच असल्या तरीही
धिस इज रॅशनल थिंकिंग.

वाद झाला ? हरकत नाही.
भांडण ? नो प्रॉब्लेम.
तरी बेड्वर उत्तम पार्टनर व्हायचं
धिस इज रॅशनल थिंकिंग

तिला आयुष्यात प्रश्न पडलेत [असं त्याला वाटतंय]
त्याला त्याच्या व्यवसायात [खात्रीने]
मग ?
दोघांचे इंडिव्हिज्युअल “इशूज” आहेत !
धिस इज रॅशनल थिंकिंग.

वेगवेगळ्या झाडांवर उमलायचं.
त्याचं वेगळं, तिचं वेगळं.
रस दोघांचा एकच , तरीही…..
छोडो यार.
धिस इज रॅशनल थिंकिंग.

त्यानं एखाद्या वेळेस बिघडून जाऊन,
नियम विसरून ,
एखादा एकत्र वगैरे प्रोग्राम ठरवायचा.
तिने तिच्या खास कमावलेल्या व्यावसायिक शैलीत,
कमालीची आस्था दाखवत , त्याला “पुन्हा कधीतरी राज्जा” म्हणायचं
त्यानं हिरमुसायचं , कुढायचं, चिडायचं …..

हां …..धिस मे बी रॅशनल थिंकिंग अगेन

जय रॅशनल थिंकिंग,
जय अल्बर्ट एलिस !